निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर
वणी : सध्या सहकार क्षेत्राचे पडघम चहूकडे वाजत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने झरी जामणी येथील विविध ग्रामपंचायत मार्फत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.सिंधी वाढोणा र.नं.८६४ ता. झरी (जामनी) जि. यवतमाळ यामध्ये पठारपुर, पिल्की वाढोणा, सिंधी वाढोना, डोंगरगाव या गावा मिळुन निवडणुक (ता.१७ एप्रिल) रोजी सिंधी वाढोना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पार पडली. या निवडणुकीत शेतकरी पॅनल चे उमेदवार यांचा बहुमताने विजयी झाले आहेत.
माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात मा.विवेक आबाराव मांडवकर, मा.विलास आबाराव मांडवकर, मा.देवराव नांदेकर, यांचे सहकार्याने शेतकरी पॅनल चे राखिव उमेदवार रिता रविंद्र उपरे या २२५ मतांनी विजयी झाले आहे. तसेच इतर मागास प्रवर्ग मतदार संघाचे उमेदवार भास्कर बाळकृष्ण नांदेकर यांनी २१३ मते घेऊन विजयी झाले. शेतकरी पॅनलचे उमेदवार सुभाष रघुनाथ निखाडे (२३२ मत), दिवाकर नानाजी महाकुलकार (२१७ मत), विजय आबाराव मांडवकर (२१५ मत), सुनिल गोविंदा पत्रकार(२१० मत), मंगेश महादेव मोहितकर (२०८ मत), दादाजी रामचंद्र बेलेकार (२०२ मत), रमेश साधू जिवतोडे (१८८ मत),व शेतकरी पॅनलचे अनपोज उमेदवार वामन दादाजी कुळमेथे यांनी निवडणुकीत मते मिळवून भरभरुन यश प्राप्त केले.
सदर निवडणुकीत मतदारांनी आपल्या मतांचा कौल शेतकरी पॅनलला दिल्याने सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाल्याने कार्यकर्त्यां मध्ये नवा जोश निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
शेतकरी पॅनलच्या 'पतंग' चा दणदणीत विजय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 19, 2022
Rating:
