योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : तालुक्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये उत्साह दिसून येत होता. शाळेला, तोरण, पोस्टर, विविध स्टॉल, पालकांची गर्दी, अधिकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती दिसून आली निमित्त होते शाळापूर्व तयारी मेळाव्याचे कोरोना नंतर शाळेत येणाऱ्या दाखल पात्र विद्यार्थी हे पूर्णतः गोंधळलेल्या अवस्थेत राहणार आहे. अंगणवाडी किंवा शाळा न पाहिलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओळख व्हावी तसेच शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याची जाणीव व्हावी यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळे शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले.
गेले दोन वर्ष कोरोना मुळे शाळा व अंगणवाडी बंद असल्याने सर्वात जास्त नुकसान शालेय विद्यार्थ्यांचे झाले आहे. अनेक विद्यार्थी लिहणे वाचणे विसरले आहेत तर अनेक विद्यार्थी शालेय प्रवाहाच्या दूर गेले असल्याचा शासनाचा अंदाज आहे तर आता पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे पुढील सत्रात नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्व तयारी करून घेता यावी यासाठी शिक्षण विभागाने या शाळापूर्व तयारीचे आयोजन केले होते. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व प्रथम या एनजीओ च्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आज सकाळी ७ वाजता पासून या मेळ्याव्यांना शाळेत सुरवात करण्यात आली त्यासाठी कालच शाळेतील शिक्षकांनी गावागावात दवंडी, प्रभात फेरी, पथनाट्य, फलक लावून जनजागृती केली. दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या घरी पत्रिका देत त्यांना रीतसर आमंत्रण दिले. आणि आज प्रत्यक्ष रित्या या मेळाव्यात या विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसमोर विविध अंगाने चाचणी घेतल्या गेली. त्यात पालकांनी उत्साह दाखविला यासाठी गावातील अंगणवाडी सेविकांचा सहभाग घेण्यात आला होता. तर गावातील सरपंच, ग्रा प सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील नागरिक, पोलीस पाटील यांना ही आमंत्रित केले गेले होते. या मेळाव्याला शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विषयसाधन व्यक्ती, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, यांनी भेटी देऊन पाहणी केली.
जिल्हा परिषद शाळा भेंडाळा येथे शाळा पुर्व तयारी मेळावा व संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच माजी अध्यक्ष्य मारोती गिरसावळे कडून महादिप उपक्रमात भाग घेणाऱ्या १४ विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी उपस्थित सरपंच शुभागी आसुटकर, उपसंरपच संतोष भोगेकर, पुलिस पाटिल पुरूषोत्तम मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिचे अध्यक्ष अनिल निंदेकर, उपाध्यक्ष विध्याताई पानघाटे, माजी अध्यक्ष मारोती गिरसावळे, मुख्याध्यापक बळीराम तुडमवार, शिक्षक अमर मडावी, दिनेश बावणे व सर्व शिक्षकाचे विशेष योगदान होते.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांची विविध क्षमतेचे निरीक्षण शाळेतील शिक्षकांनी केले त्यात शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी चे स्टॉल लावण्यात आले होते त्यातून विद्यार्थ्यांचे निरिक्षण करून पालकांचे समुपदेशन करण्यात आले. पुढील दोन महिन्यात या सर्व क्षमतेची तयारी शिक्षक पालकांच्या मदतीने पूर्ण करून घेत जून महिन्यात पुन्हा याच प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन करीत मुलांचा विकास तपासला जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी दिली.
प्रत्येक शाळेत रंगला शाळा पूर्व तयारी मेळावा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 19, 2022
Rating:
