जनतेच्या विकासाचा निधी राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आणि मनोरंजनासाठी उधळणार का - निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)
बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!या साठी महाराष्ट्र शासनाचा निधी दिला जातो. त्यासोबतच अनेक आमदारांनीही आपला निधी या साहित्य संमेलनासाठी दिल्याचे सांगण्यात आले आहे.
गोरगरीब जनतेच्या विकासासाठी आमदार खासदार यांचा निधी वापरायला पाहिजे, तो निधी उदगीर येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या मनोरंजनाचे कार्यक्रम आणि राजकीय मैदान गाजवणारे राष्ट्रवादीचे नेतेमंडळी हे आपल्या स्वार्थी राजकारणासाठी खर्च करणार का? हा मोठा प्रश्न आहे. यातून जनतेच्या विकासाचा पैसा मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना वाटप करण्यात येत आहे. यात साहित्यिकांनाही फाटा दिला जातोय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारण करण्यासाठी यांनी हे व्यासपीठ वापरायला नको होते,पण राजकारणी लोकांना मिळेल त्या व् व्यासपीठावर पोळी भाजण्याची सवय आहे
याठिकाणी फक्त आणि फक्त साहित्यिकांना संधी मिळाली पाहिजे, परंतु दुर्दैवाने साहित्यिकांना बाजुला ढकलुन राजकारणाचे मैदान गाजवण्याचे राष्ट्रवादीने ठरवले आहे.
या साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर आहेत तर स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादीचे राज्यमंत्री संजय बनसोडे आहेत आणि उद्घाटक म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार साहेब आहेत!एकंदरीत हा राष्ट्रवादीचा महामेळावा आहे. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही! जनतेच्या पैशाची उधळण राजकिय स्वार्थ साधण्यासाठी होत असलेल्या या कार्यक्रमाला महामहीम राष्ट्रपतींनी ही उपस्थिती लावायची ठरवली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे साहित्य संमेलन साहित्यिकांचे आहे की राजकारण्यांचे ?असा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. असेही विचार विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी मांडले आहेत.
वास्तविक पाहता ग्रामपंचायती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, आमदारांचा निधी, खासदारांचा निधी हा सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा साठी देण्यात आलेला असतो. हा निधी साहित्य संमेलनावर स्थानिक स्वराज्य संस्थांनी का उडवावा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या
जनतेच्या विकासाचा निधी राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आणि मनोरंजनासाठी उधळणार का - निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 16, 2022
Rating:
