कार्यक्रमाची यशस्वीता अन विरोधकांनी रचले षडःयंत्र!


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शहरात रामनवमी निमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढून, शहर अख्खे भगवेमय दिसून आले, रामनवमी समिती अध्यक्ष म्हणून विजय चोरडीया यांनी मोठे परिश्रम घेतले. याच रॅलीत भाजपचे कार्यकारी सदस्य असलेले विजय चोरडिया यांनी आपल्या श्वानाला भगवे वस्त्र परिधान करुन,मिरवणूकीत सामील केल्याने,मोठा वादंग निर्माण झाला होता. सर्वत्र टिकेची झड त्यांच्या दिशेने फिरकली, त्यामुळे आज (१६ एप्रिल) शनिवारला, विजय चोरडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन, त्याबाबत खुलासा देऊन दिलगीरी व्यक्त केली.

सविस्तर वृत्त असे की, रविवार (१०एप्रिल) ला शहरात रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत राम नवमी समिती अध्यक्ष विजय चोरडिया यांनी,आपल्या पाळीव कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान केल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती.

श्वान हा चोरडिया परिवारातील एका सदस्याप्रमाणे असल्यामुळे त्याला भगव्या रंगाचे वस्त्र घालण्यात आले. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास विजय चोरडिया यांनी दिलगीरी व्यक्त केली. मात्र, श्वासनाचे छायाचित्र काढुन,सोशल मिडयावर वायरल करण्याचा विरोधकांचा हा कट व षडःयंत्र असल्याचे यावेळी विजय चोरडीया यांनी सांगितले.
रामनवमी समिती अध्यक्ष म्हणून निवड होताच विजय चोरडिया यांनी, रक्तदान शिबिर, अन्नछत्र, पाणपोई, गरजुंना मदत करीत समाजकार्य करुन, सामाजिक ऐक्य जोपासण्याचा प्रयत्न करीत असतांना काही समाज कंटकामुळे अशी परिस्थिती उद्भवली असे चोरडिया म्हणाले.
माध्यमांशी बोलतांना विजय चोरडिया यांचे मन गहिवरुन आले. परंतु विरोधाला न जुमानता आपले सामाजिक कार्य असेच सदैव सुरु राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी रामनवमी समिती अध्यक्ष विजय चोरडिया, राजाभाऊ बिलोरिया, शाम भडघरे, अजिंक्य शेंडे, उमेश पोद्दारसह मोठ्या संख्येने राम नवमी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची यशस्वीता अन विरोधकांनी रचले षडःयंत्र! कार्यक्रमाची यशस्वीता अन विरोधकांनी रचले षडःयंत्र! Reviewed by सह्याद्री चौफेर on April 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.