रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर
कळंब : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत समूह संसाधन व्यक्ती यांचे थकीत असलेल्या मानधन तात्काळ अदा करून त्यांच्या मानधना मध्ये वाढ करण्यात यावी या मागणीचे संदर्भात उमेद कॅडर संघटनेच्या वतीने कल्याणकारी मंडळाचे तालुकाध्यक्ष वैशाली लखपती यांच्या नेतृत्वात तहसिलदार साहेब कळंब यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी सचिव सविता डंभारे, कोषाध्यक्ष अंजली दाभेरे, उपाध्यक्ष दिपा आमझरे, प्राची देशमुख, संपर्क प्रमुख मंदा मून, शारदा पिसे, किरण सोनपिंपरे, भावना तोडसाम, अलका मेश्राम, शशिकला देवतळे, सीमा कांबळे, सविता वरफोडे, वंदना वाकुलकर, भाषा कोणती इत्यादी महिला उपस्थित होते.
(थकीत मानधन व मानधना मध्ये वाढ द्यावी या मागणीसाठी जमलेल्या उमेद कॅडर संघटनेच्या महिला)
उमेद कॅडर च्या वतीने ग्राम विकास मंत्री यांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 17, 2022
Rating:
