देहबाजार सरणावरचा...वर्षां शिदोरे


देहबाजार सरणावरचा...

आज अंगणात देहबाजाराच्या
एक वेगळाच परिपाठ होता...
जगण्यासाठी संघर्षाचा मार्ग
तुम्हां-आम्हांपेक्षा वेगळा होता...

लंगड्या विचारांआड लपून
एकीकडे वासनेचा हाव होता...
दुसरीकडे मात्र तोंड दडवलेला
सज्जनपणी भिकार आव होता...

दगडाच्या देवाला पुजणाऱ्यांना
देह व्यापार का रे वाटत होता...?
अरे, माणसासारखी माणसंच ती
तरीही वागणुकीत भेद होता...

या संस्कृतीच्या भेदरटपणाचा
काळिमा कुत्सित नजरेत होता...
समाजाच्या अविचारी मुसक्यांना
तो चार भिंतीत का कोंडत होता...?

कळलंच चुकून दुर्बुद्धीने म्हणा
देह सरणावरती तडफडत होता...
माणसाला माणसासारखं वागवा
शेवटी एकंच टाहो फोडत होता...

© कु. वर्षा शिदोरे
नाशिक जिल्हा
मो. ८७९३७९९७७७


देहबाजार सरणावरचा...वर्षां शिदोरे देहबाजार सरणावरचा...वर्षां शिदोरे Reviewed by सह्याद्री चौफेर on April 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.