विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यातील वनोजा देवी येथील शेतकरी सुधाकर नारायण धांडे यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने शेतात असलेल्या स्पिन्कलर पाईप, शेती उपयोगी असणारे साहित्यासह शिवार जळून खाक झाला आहे.
सदर घटना काल दुपार च्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, त्याचेवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली असून आगीचा पंचनामा करण्यात येणार आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून यात कुटार, कडबा, स्पिन्कलर सेट, स्पिन्कलर पाईप, टाटवे,खत, सोलर बॅटरी डवरे यासह इतरही साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
गोठ्याला लागली आग, स्पिन्कलर पाईप व शिवार जळून खाक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 18, 2022
Rating:
