बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था, संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर, सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर व टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक शंकर बोइनवाड यांच्या त्यांना साहित्यिकाचा कोल्हेवाडी चा बाजार या कवितासंग्रहाला नांदेड पुणे येथील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, संस्कार प्राथमिक विद्यालय उदगीर येथील सहशिक्षिका बालिका मुळे यांची इंडियन काँग्रेस ब्रिगेडबच्या महिला आघाडीच्या लातूर जिल्हाअध्यक्षी पदी निवड झाल्याबद्दल, प्रदीप ढगे यांनी मराठा सेवा संघात जिल्ह्यात उत्कृष्ट वक्ता म्हणून कार्य केल्याबद्दल व गणपतराव गादिया सर यांनी शैक्षणिक, सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संचालिका महानंदा सुवर्णकार, रेश्मा वाडीकर, बालाजी सुवर्णकार, विश्वनाथे सर यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी संस्थेचे विविध उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव तथा टीचर ग्रुप चेॲडमिन बालाजी सोनकर यांनी केले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न.
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 18, 2022
Rating:
