योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : तालुक्यातील जनतेकरीता बुधवारी ता. 20 ला भव्य स्वरुपी अशा आरोग्य मेळाव्याचे आयोजन येथील ग्रामीण रुग्णालय झरी या ठिकाणी करण्यात आले आहे. या मेळाव्यात डॉ. राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्यसेवा अकोला, डॉ. आर. डी. राठोड जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय रुग्णालय यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य मेळावा होत असल्याची माहिती येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित कारमोरे व तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांनी दिली आहे.
या तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्यामध्ये हायड्रोशील, हर्निया, दंत विकार, कर्करोग, कुपोशित बालक, मतिमंद बालक, गरोदर मातेची तपासणी गर्भाशयाचे विकार, मधुमेह, रक्तदाब तथा आदी रोगांचे निदान व उपचार करण्यात येइल. तसेच या शिबिरामध्ये पात्र नागरिकांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णांची नोंदणी करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड देखील वितरीत करण्यात येणार आहेत करीता या आरोग्य मेळाव्याचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असेही कळविण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालयात भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळावा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 18, 2022
Rating:
