सह्याद्री चौफेर | गोलेपल्लीवार
सावली : सावली तालुक्यातील जीबगाव ग्रामपंचायत येथे जिल्हा विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे वर्क ऑर्डर ग्रामपंचायतला प्राप्त झाले नसतानाही विनापरवानगी काम सुरू असल्याचा आरोप जीबगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राकेश गोल्लेपल्लीवार यांनी केला आहे. विनापरवानगी ने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचे सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा निवेदनाद्वारे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
परंतु आज आठ दिवसाचा कालावधी लोटुन ही कामाजी चौकशी करण्यात आली नसल्याने जिल्हा निधीतील सी सी रोड बाधकाम पुर्ण झाले असल्याने अधिकारी यांनी सुध्दा या भ्रष्टराला दुजोरा देत असल्याचे दिसुन येत आहे. जीबगाव ग्रामपंचायत अंतर्गत निळू कीनेकर ते मेन रोड व गंगाधर भोयर ते प्रकाश देठे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. सदर काम हे सरपंच, सचिव व कंत्राटदारांच्या संगनमताने सुरू आहे. या कामाचे वर्क ऑर्डर ग्रामपंचायत कडे उपलब्ध नसतांना कामाची सुरुवात कशी काय केली ? असा आरोप ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी निवेदनातून करण्यात आली आहे. विनापरवानगी ने सुरू असलेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"सदर कामाबाबत ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये कोणतेही प्रस्ताव न ठेवता सदस्य यांना माहीती न देता विना परवानगीने कामास सुरुवात करण्यात आली त्यामुळे मनमर्जीने काम सुरू असून निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आठ दिवसा आधी संर्वग विकास अधिकरी यांचे केले असताना मात्र निवेदनाकडे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे."
– राकेश गोल्लेपल्लीवार ग्रा.सदस्य ग्रामपंचायत जीबगाव.
"सदर कामाचे वर्क ऑर्डर व अंदाजपत्रक ग्रामपंचायतला उपलब्ध आहे कामास सभेत मंजुरी घेऊनच शाखा अभियंता यांचे मार्गदर्शनात काम सुरू आहे."
- सरपंच पुरुषोत्तम चुदरी
ग्रामपंचायत जीबगाव
सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाची चौकशी करा राकेश गोल्लेपल्लीवार सदस्य यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 26, 2022
Rating:
