मधमाशांच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : तालुक्यातील येडशी गावातील एका इसमावर मधमाशाने हल्ला करून ठार केल्याची दुःखद घटना आज (ता.२५) एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

हा इसम येडशी गावातील उपसरपंच असून, भोला महादेव नगराळे (अंदाजे ४०) असे मधमाशाने हल्ला करून ठार केलेल्याचे नाव आहे. घरचा कर्ताधर्ता च निघून गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सूत्राच्या माहितीनुसार आई विमल महादेव नगराळे ह्या सोसायटीच्या निवडणूकीमध्ये उमेदवार म्हणून उभे होत्या. विजय सुद्धा निश्चित केला मात्र,त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने पेढे आणण्यासाठी गेलेल्या येडशी येथील उपसरपंच भोलाभाऊ नगराळे यांच्या वर "अपना देशी बार" समोर एका झाडाला असलेल्या मधमाशाने (आग्या मोहं)  अचानक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. ही बाब परिसरात पसरताच मित्र मंडळींनी त्या दिशेने धाव घेतली. दरम्यान,तिथे ते पडून असल्याचे दिसून आले. अश्यातच त्यांना सरकारी दवाखाना मुकुटबन येथे नेण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरू ठेवत त्यांना वणी येथे हलविण्यात आले. मात्र, वणी येथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील,मुलगी व मुलगा असा आप्त परिवार आहे. 
मधमाशांच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू मधमाशांच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on April 25, 2022 Rating: 5
Powered by Blogger.