३२ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

मारेगाव : तालुक्यातील पहापळ येथील तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केली.आज (ता.२५ एप्रिल) सोमवारला दुपारी तिन वाजताच्या दरम्यान, घटना घडली. विशेष उल्लेखनीय की, तरुण हा विवाहित असून त्याच्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोट होऊन दहा वर्षे झाले आहे.

विशाल शंकर इंगोले (३२) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या घटस्फोटीत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार विशालने आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान,विषारी औषध सेवन केले. निदर्शनास येताच त्याला कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराअंती त्याचा मृत्यू झाला. ३२ वर्षीय विशाल हा विवाहित असून त्याच्या पाठीमागे एक मुली, आई वडील व भाऊ असा परिवार आहे.

अधिक तपास पोलीस करीत आहे.  
३२ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या ३२ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on April 25, 2022 Rating: 5
Powered by Blogger.