कोसारा,जुनी पडोली (शर्मा पेट्रोलपंप) पडोली फाटा रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर,आईस कॅट पट्टे ही कामे तात्काळ करण्यात यावी - प्रदेश सचिव अनिल डोंगरे यांची मागणी
कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : चंद्रपूर नागपूर हायवे रोड लगत नवीन चंद्रपूर (कोसार),जुनी पडोली तसेच पडोली फाटा चौक घुगुस रोड हे चौक नेहमी वर्दळीचे असून या ठिकाणच्या रोडचे स्पीड ब्रेकर नादुरुस्त असून तसेच जुनी पडली साईटच्या रोडला स्पीड ब्रेकर नसून या भागात नेहमी छोटे-मोठे अपघात होत असतात ही कामे तात्काळ करण्यात यावे याकरीता अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या माध्यमातून विशाल कुमार मेश्रम साहेब निवासी उपजिल्हाधिकारी तसेच सुनील कूभे साहेब कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आली. ही कामे तात्काळ न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला. यावेळी अशोक पटेल तालुका उपाध्यक्ष हे होते.
कोसारा,जुनी पडोली (शर्मा पेट्रोलपंप) पडोली फाटा रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर,आईस कॅट पट्टे ही कामे तात्काळ करण्यात यावी - प्रदेश सचिव अनिल डोंगरे यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 26, 2022
Rating: