चिमडा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू करा-नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : चंद्रपूर-गडचिरोली महा मार्गावरील चिमडा नदी वरील पुलाचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे काम पूर्णत्वास असल्याचे दिसत असून पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे.

चंद्रपूर-गडचिरोली महामार्गाचे काम गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे सदर काम पूर्णत्वास झाले असल्याचे दिसत आहे.त्याच प्रमाणे चिमडा नदीवर सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने करीत ते पूर्ण झाल्याचे दिसत आहे.सदर पुलाच्या बाजूने वाहतूक सुरू आहे मात्र त्या ठिकाणी रोजच अपघाताची मालिका सुरू आहे. त्यामुळे याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच धुळीने नागरिक बेहाल होत आहे.

त्या साठी चिमडा नदीवरील पुलावरून लवकरात लवकर वाहतूक सुरू करून प्रवाशांना प्रवास सुलभ करून द्यावे अशी मागणी सावली तालुका भाजपा महामंत्री तथा न.पं.नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय रस्ते महामार्ग बांधकाम विभाग ला पत्र पाठविले आहे.
चिमडा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू करा-नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी चिमडा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू करा-नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on April 26, 2022 Rating: 5
Powered by Blogger.