आटोला अपघात, दोन गंभीर जखमी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगावहून घुगलदरा येथे लग्न सोहळ्याला जात असतांना प्रवाशी आटो ला अपघात झाला. यात दोन गंभीर तर, चिमुकल्यांना किरकोळ मार लागला असून ही घटना आज (ता.27) एप्रिल रोजी मारेगाव यवतमाळ महामार्गांवरील खडकी (टेकडी) टर्निंग वर सकाळी ९:३० वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार मारेगावहुन नेहारे परिवार व इतर जण घुगलदरा येथे लग्न सोहळ्याला निघाले, सकाळचे साडे नऊ वाजले असतील या दरम्यान, आटो चालक मालक भूपेश वाडगुळे (40) रा.मारेगाव याला वाहन चालवताना अचानक झोप लागली असता आटोचे बॅलन्स बिघडले आणि आटो पलटी होऊन रस्त्याच्या कडेला आदळला यात मधुकर लसवंते (65) रा.पुलगाव जि. वर्धा, यांच्या पायाला जबर मार लागला. तसेच आटो चालक भूपेश वाडगुळे याला ही जबर गंभीर दुखापत झाली आहे. तर अदिती राऊत (7) रा. कळंब, दर्शक पवन नेहारे (2) रा. मारेगाव या लहान चिमुकल्यांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. जखमीना मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून भूपेश याला यवतमाळ आणि मधुकर लसवंते यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

यावेळी रुग्णालयात बघ्याची  एकच गर्दी उसळली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र, झालेल्या अपघातात पत्रकार पंकज नेहारे यांचे मोठे बंधू पवन नेहारे यांचा मुलगा व सासरा यांचा समावेश आहे.
 
आटोला अपघात, दोन गंभीर जखमी आटोला अपघात, दोन गंभीर जखमी Reviewed by सह्याद्री चौफेर on April 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.