शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्त्याचे काम चालू करण्यासाठी दिले निवेदन


 
नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

झरी : मा.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर असलेल्या शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्त्याचे काम बंद असलेले त्वरित सुरू करा, अशी मागणी डोंगरगाव वासियांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली.

२०१९ ते २०२० या आर्थिक वर्षात मा.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सिंधीवाढोना ते डोंगरगाव अंतर ५ किलोमिटर रस्त्याचे काम मंजूर झाले,त्यानंतर कामाला सुरवात झाली. सदर मंजूर रस्त्यावर मुरूम व गिट्ठी चा एक थर टाकण्यात आला आणि काम बंद झाले. आता हे काम बंद होऊन जवळ जवळ तीन वर्ष झाले आहे.
रस्त्यावरील मुरूम व गिठ्ठी ची व्यवस्थित दबाई न झाल्याने व पाऊसामुळे टाकलेला मुरूम वाहून गेला. परिणामी रस्त्यावर फक्त गिठ्ठीच उरली आहे.

गावाचा मुख्य रस्ता असल्यामुळे गावकऱ्यांना या रस्त्यावरून दैनंदिन ये जा करणे कठीण झाले आहे. तीन वर्षे लोटूनही याकडे संबंधितांनी साधे लक्ष सुद्धा दिले नसल्याने शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. दि. २४ मार्च २०२२ रोजी गावातील रहिवासी बाळा रूप पवार यांचा सदरील रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला आहे,अशाप्रकारे अनेक घटना या रस्त्यावरून ये जा करतेवेळी घडत आहे, अशा तक्रारी नागरिकांच्या आहे. तसेच या नंतर या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचाही मृत्यू झाल्यास किंवा दुखापत झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभागाची असेल आणि येत्या आठ दिवसात या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संपूर्ण गावकरी याच रस्त्यावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा उपस्थित डोंगरगाव ग्रामवासीयांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनद्वारे देण्यात आले.

निवेदन देते वेळी शिवसेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुगुल यांच्या नेतृत्वात वासुदेव देठे,तेजस झाडे,रमेश जिवतोडे,गोपीचंद निखाडे,सूरज कष्टी,रामदास चारलिकर,विश्वास बल्की,तुकाराम नवले,यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यासह डोंगरगाव ग्रामवासी उपस्थित होते.


शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्त्याचे काम चालू करण्यासाठी दिले निवेदन शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्त्याचे काम चालू करण्यासाठी दिले निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.