विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : हटवांजरी येथे जीवनविकास माध्य.व उच्च माध्य.विद्यालय हटवांजरी येथील विद्यालयात दिनांक ०४ मे २०२२ ते ११ जून २०२२ पर्यंत सकाळी ७ ते ९ या दरम्यान संपूर्णपणे निःशुल्क "शैक्षणिक उन्हाळी शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.
कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शाळा चालू बंद मुळे विद्यार्थाचे अतिशय शैक्षणिक नुकसान झाले. त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये ऑनलाईन शिक्षण उपलब्ध झाले परंतु ग्रामीण व अतिदुर्गम भागात मोबाईल ची व तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे खेड्यात नावालाच शिक्षण झाले होते.
परंतु ग्रामीण भागात अशाप्रकारचा उपक्रम राबवून जी शैक्षणिक तूट झाली होती ती भरून काढण्यास अतिशय मोलाची मदत मिळेल.
अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे पालक व विद्यार्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त या परिसरातील विद्यार्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व ताबडतोब आपली नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापकाने केले आहे.
"कोविड-१९ च्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थाचा जो शैक्षणिक आलेख खाली गेला व अभ्यासापासून दूर झाले त्याकरीता या शैक्षणिक शिबिराद्वारे गुणवत्ता कौशल्य वाढवून अभ्यासात आवड निर्माण करण्याचा हेतू आहे."
- मुकेश महादेवराव महाडुळे मुख्याध्यापक
जीवनविकास माध्य.व उच्च माध्य. विद्यालय,हटवांजरी
"उन्हाळी शैक्षणिक शिबिर" हटवांजरी येथे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 28, 2022
Rating:
