सह्याद्री | चौफेर न्यूज
मारेगाव : कुंभा येथील दै. सकाळचे बातमीदार तथा "विदर्भ सर्च न्यूज" नेटवर्क पोर्टलचे उपसंपादक कैलास नथ्थूजी ठेंगणे यांच्या धावत्या दुचाकीवर रानडुकराने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारला सकाळी साडे दहा च्या सुमारास ईसार पेट्रोल पंप पासून हाकेच्या अंतरावर राज्यमहामार्गावर घडली.
सविस्तर असे की,कैलास ठेंगणे हे आज सकाळी कुंभा येथे शेतात मोपेड स्कुटीने जात असतांना राज्यमहामार्गावर करणवाडी मारेगावच्या मधात झुडपातून सैरावैरा आलेल्या रानडुकराने थेट वाहनावरील कैलास यांचेवर जबर हल्ला चढविला. काही कळण्यापूर्वी घडलेल्या घटनेने कैलास हे धाडकन खाली कोसळले.या घटनेत त्यांना हात, पायांना जबर इजा झाली. तात्काळ त्यांना प्राथमिक उपचारानंतर वणी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हाताची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले असून,त्यांचेवर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
दरम्यान, रानडुकर हल्ला व जखमी प्रकरणी वनविभाग प्रशासनास तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ आर्थिक मदत प्रदान करण्याची मागणी पिडीताने केली आहे.
"मानवी हल्ल्या पाठोपाठ वन्य प्राण्यांचे हल्ले पत्रकारांवर होऊ लागल्याने पत्रकारांच्या सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला असून,पत्रकार संरक्षण कायदा कागदावरच न असता खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अंमलबजावणी ची गरज असल्याचे मत सह्याद्री चौफेर न्यूजचे सर्वेसर्वा कुमार अमोल यांनी व्यक्त केले आहे."
पत्रकार कैलास ठेंगणे यांचेवर रानडूकाराचा हल्ला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 28, 2022
Rating:
