कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
हिंगणघाट : गेल्या 3 महिन्यापासून तहसील कार्यालया समोर येथील मोहता मिल कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, अजूनही त्यांना न्याय मिळाला नसल्याने आज सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांनी भेट देऊन आपले आंदोलनास समर्थन असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.
मागील 7 मे 2021 पासून मोहता मिल वीणा परवानगीने बंद करून ठेवण्यात आली आहे, व कामगारांचे पगारही अजुन पर्यंत दिल्या गेले नाही. त्यामुळे कामगारांना व त्यांच्या परिवारावर उपासमारी ची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने आर्थिक चनचन भासत असल्याने त्यांच्या जगण्याच्या मोठा प्रश्न निर्माण झाल्याने संतापलेल्या मोहता मिल कामगारांनी तहसील कार्यालयासमोर अखेर साखळी उपोषणाला बसले आहे.
कामगारांचे दैनंदिन जीवन चव्हाट्यावर आल्याने मंगला ठक यांनी उपोषणास बसलेल्या कामगारांना भेट दिली. कामगारांशी संवाद साधला.
तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमाघे झोपडपट्टी वसाहत असून प्रशासन त्यांना राहण्यासाठी वेगळी व्यवस्था न करता वारंवार नोटीस देवून येथील गोरगरीब लोकांना झोपडपट्टी उठविण्याची धमकी देत असून दबंगगिरी चालवली जात असून असा आरोप झोपडपट्टी वासियांनी केला आहे. मात्र, येथील लोकांची राहण्याची अवस्था फार बिकट असल्याने झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर नागरिक उपोषणाला बसले आहे.
मंगलाताई ठक यांनी या दोन्ही आंदोलनाला आज भेट दिली असता उपोषण कर्त्यांनी त्यांना मदत्तीचा हात मागितला. यावेळी शक्य होईल तेवढे या गरजू लोकांच्या पाठीशी उभ राहून त्यांना मदत करणार असल्याचे मंगलाताई ठक यांनी सांगितले.
मोहता मिल कामगार साखळी उपोषण व उपजिल्हा रुग्णालय मागील झोपडपट्टी उपोषणास मंगलाताई ठक यांनी दिली भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 21, 2022
Rating:
