टॉप बातम्या

कुंभा येथील विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मारेगाव : कुंभा येथील ३० वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (ता.२१ एप्रिल) रोजी ३:३० वाजताच्या दरम्यान, घडली.

मारोती जगन कोकुडे (३०) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे. दिवस भर तो घरीच होता. भूक लागली म्हणून आईला त्याने बिस्किट आणण्याकरिता दुकानात पाठविले. दरम्यान, घरी कोणी नसल्याचे पाहुण मारोतीने घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. 

आई दुकानातून घरी येताच ही घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अस्पस्ट असून,मारोती च्या पश्चात पत्नी, दोन मुले, व अंध आई, वडील असा आप्त परिवार आहे.

अधिक तपास पोलीस करीत आहे.


Previous Post Next Post