मोहम्मद अशफाक यांची राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य पुनर्वास संस्थानाचे प्रथम डिप्टी रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती


सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तिकरण विभागद्वारे मोहम्मद अशफाक यांची डिप्टी रजिस्ट्रार या पदावर नियुक्ति करण्यात आली आहे.

मोहम्मद अशफाक हे इंडियन डिफेन्स सर्विसेज (सिविलियन) कैडरचे अधिकारी असून सध्या रक्षा मंत्रालयात प्रमुख सिविल हायड्रोग्राफिक ऑफिसर म्हणून तैनात आहेत. ही नियुक्ती वर्ष २०१६ मध्ये संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) द्वारे निवड करण्यात आली होती. याआधी त्यांनी भारतीय नौदलात पंधरा वर्षे सेवा केली होती.

मागील दोन अर्थसंकल्पात केंद्रीय शासनाचे मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे आणि अर्थसंकल्पात राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्थेच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. ह्यासाठी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळील सेहोर जिल्ह्यात ३०० कोटींहून अधिक बजेटची पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहे. मोहम्मद अशफाक हे पायाभूत सुविधांना प्रारूप देण्यासाठी तसेच विकासावर देखरेख ठेवण्यासाठी विभागाद्वारे नियुक्त केलेले पहिले स्थायी अधिकारी आहेत. ही संस्था मानसिक आरोग्य पुनर्वसनस्तरातून जागतिक प्रतिष्ठित संस्था म्हणून स्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
मोहम्मद अशफाक हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत जिथे त्यांनी एम फिल पदवी पूर्ण केली आहे. जरी ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोग्राफीमधून हायड्रोग्राफीमध्ये अभियंता पदवीधर असले तरी त्यांना मानसशास्त्रात आधीपासूनच विशेष रस होता. ते मानसशास्त्रात पदव्युत्तर आहे, त्यानी मानसशास्त्रात यूजीसी नेट आणि एमएच-सेट उत्तीर्ण केले आहेत. एमएच-सेट मध्ये ते मानसशास्त्र विषयात स्टेट टॉपर होते. आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांनी १२ वी नंतरचे एम फिल पर्यंत हे पूर्ण अभ्यास आपल्या भारतीय नौदल कारकिर्दीत पूर्ण केले असून त्यांचा अजूनही आपला अभ्यास सुरू ठेवला आहे. सध्या आयआयआरएस-इस्रो येथे रिमोट सेन्सिंगमध्ये पीएचडी करत आहेत.
शहरातील शास्त्री नगर येथील वास्तव्यास असलेले मोहम्मद अशफाक यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. पण मात्र, आपल्या मेहनत, जिद्द अणि चिकाटीने त्यांनी आपल्या समाजातील अनेकांना यशासाठी प्रेरणा दिली आहे. जिल्ह्याचा मान राष्ट्रीय स्तरावर वाढविल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे. ते आपल्या यशाचे श्रेय त्यांची आई, दिवंगत बाबा आणि वणीतील शिक्षकांना देतात. विशेषकरून यात विवेकानंद विद्यालय येथील श्री मानकर सर, एकरे सर, आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कोचेटा सरांचा आवर्जून उल्लेख करतात.

ब्लैक डायमंड शाळेला त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभलेले असून येथील विद्यार्थी आणि पालकांना ते नेहमी संबोधित करीत असतात. त्यांचा या यशासाठी पंचायत समितीचे सभापती श्री संजय पिंपळशेंडे आणि संपूर्ण ब्लैक डायमंड शाळेच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहे.
मोहम्मद अशफाक यांची राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य पुनर्वास संस्थानाचे प्रथम डिप्टी रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती मोहम्मद अशफाक यांची राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य पुनर्वास संस्थानाचे प्रथम डिप्टी रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on April 21, 2022 Rating: 5
Powered by Blogger.