योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात मात्र कमालीची घसरण झाली आहे. आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचे चित्र आहे.
किलोमागे दहा ते पंधरा रुपयांचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. मागील काही वर्षी कांदा शंभर रुपये किलोच्या आसपास पोहचला होता यामुळे ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आले असले तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांद्याच्या पिकाबाबत शेतकऱ्यांना काहीसा लाभ मिळाला होता.
इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. परंतु कांद्याचे दर मात्र कमी झाले आहेत. कांद्याचे दर याच आठवड्यात अचानकपणे ९ ते १२ रुपये प्रति किलोने घटले आहे. कांद्याचा भाजीचा तडका स्वस्त झाला आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. दुसरीकडे मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांची सर्वत्र काढणी सुरू आहे. तसेच कांदा साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा बाजारात आणण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. याचा भावाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच नवीन कांदाही बाजारात आल्याने भाव कमी झालेले आहे. कांद्याचे दर हे प्रतिकिलो आठ ते दहा रुपयावर येऊन ठेपला आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी २० ते २५ रुपये प्रति किलो असा कांद्याला भाव मिळत होता. पण या आठवड्यात अचानकपणे १२ ते १६ रुपये प्रति किलो असे दर किरकोळ बाजारात आहे.
कांद्याचा भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 22, 2022
Rating:
