पत्रकारांवरील हल्ल्यांचा विविध पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध!


 सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : सध्याच्या काळात पत्रकारांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. अशीच घटना वणीत सुद्धा घडली आहे. शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाने झुंडीने येऊन विरोधात बातमी का लावली म्हणून हॉकी स्टिकने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा वणीतील विविध पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत २०१९ च्या शासकीय अद्यादेश भाग चार नुसार कारवाई करावी आणि या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

सध्याच्या काळात शासनाच्या गौण खनिज संपत्तीची चोरटी वाहतूक सुरू आहे. या तस्करीला स्थानिक नेते आणि प्रशासनाचे जणू पाठबळ आहे. यासंबंधी नमो महाराष्ट्र चे पत्रकार रवी ढुमणे यांच्यावर जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेचा वणीतील सर्वच पत्रकार संघटनाही निषेध करीत राज्य शासनाचा अद्यादेश १९ एप्रिल २०१९ क्र २९ व जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावे. आणि अशा गौण खनिज चोरट्यांचा मुसक्या आवळून पत्रकारांना संरक्षण द्यावे. अशा आशयाचे निवेदन वणी शहरातील सर्वच संघटनांचे पत्रकार जब्बार चिनी, राजू धावंजेवार, मो मुस्ताक, राजू तुरणकार,रमेश तांबे, सागर मुने,विवेक तोटेवार, प्रशांत चंदनखेडे, अजय कंडेवार, रामकृष्ण वैद्य, श्रीकांत किटकुले, राजू गव्हाणे, सूरज चाटे, पुरुषोत्तम नवघरे, सुरेंद्र इखारे, रवी ढुमणे सह आदी पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकारांवरील हल्ल्यांचा विविध पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध! पत्रकारांवरील हल्ल्यांचा विविध पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध! Reviewed by सह्याद्री चौफेर on April 22, 2022 Rating: 5
Powered by Blogger.