एसटी बंदच; विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय खासगी वाहतुकदारांकडून लूट

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. मात्र, अजूनही एसटी बससेवा सुरळीत झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यात खासगी वाहतूक सुरू आहे. मात्र, ते जादा पैसा आकारून प्रवाशांची असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लूट करीत मागील काही महिन्यापासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. तेव्हा प्रवाशांचे बेहाल झाले. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना ठरविलेल्या ठिकाणी वेळेवर पोहचणे फारच कठीण होत होते. शहरी भागात एसटी सुरू असली तरी काही बसेसची बुकींग मुख्य बसस्थानकात केल्यानंतर इतर कुठेही प्रवासी घेत नाही.

 त्यामुळे तासंतास काही बसस्थानकांवर बसची वाट पाहत उभे राहावे लागत होते. अशावेळी बस येणारच याची खात्रीही नसते काही भागात बससेवा सुरू करण्यात आली असली तरी बस फेऱ्याचे प्रमाण कमी असल्याने विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आता संप मिटला. मात्र, अजूनही सेवा सुरळीत झाली नाही. सावली तालुक्याचे ठिकाण आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी कोणतीच साधन नाही. त्यामुळे सकाळच्या सत्रातील बससेला सुरू करावी, अशी मागणी श्री. राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य जिबगाव यांनी केली आहे.
एसटी बंदच; विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय खासगी वाहतुकदारांकडून लूट एसटी बंदच; विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय खासगी वाहतुकदारांकडून लूट Reviewed by सह्याद्री चौफेर on April 23, 2022 Rating: 5
Powered by Blogger.