टॉप बातम्या

दहावीच्या विद्यार्थ्यांंना निरोप !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे नुकताच निरोप समारंभ पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक गुरूमुखी यांनी विभूषित केले हाेते.तर आयोजित कार्यक्रमाला प्रामुख्याने भिमनवार,गोरे मोडकवार,फुलझेले,खामकर धुमाने,निवलकर वाभिटकर भारतीय वार्ता न्यूज कोरपनाचे तालुका प्रतिनिधी मंगेश तिखट व अरुण निरे उपस्थित हाेते . या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषणातुंन उपस्थित शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मिनल जुमनाके, मानसी गाडगे, आकांशा झाडे, दिव्या वांढरे, कुणाल मोहूर्ले, समीक्षा बोरुले, अंकिता ताजने आदीं विद्यार्थी कार्यक्रमाला हजर हाेते. कार्यक्रमाच्या संचालन मनस्वी कोडापे या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यांत आले हाेते.त्यात प्रथम क्रमांक कुणाल मोहुर्ले, द्वितीय क्रमांक संध्या बोरूले तर तृतीय क्रमांक तनु करमानकर यांनी मिळविला.प्रथम बक्षीस,१००० रुपये शरद जोगी यांच्या कडून द्वितीय बक्षीस,७०० रुपये भारतीय वार्ता चैनल कडून देण्यात आले.

या शिवाय तृतीय बक्षीस ५०० रुपये आबिद अली यांच्याकडून देण्यात आले.
Previous Post Next Post