सह्याद्री न्यूज | बालाजी सुवर्णकार
लातूर : उदगीर ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजनासंदर्भात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उदगीर,जळकोट,देवणी तालुक्यातील पत्रकारांची बैठक स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
मंचावर कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी, उप प्राचार्य डॉ. आर.के.मस्के यांची उपस्थिती होती. साहित्य संमेलनासाठी पत्रकारांसाठी आसन व्यवस्था, पत्रकारांचा सन्मान व्हावा,पत्रकारांची संयुक्त समिती स्थापन करावी, पत्रकारातील साहित्यिकांना संधी द्यावी. सीमा वाद या प्रश्नावर परिसंवाद ठेवावा, सीमावर्ती राज्यातील पत्रकारांना साहित्य संमेलनाची माहिती द्यावी, उदगीरच्या इतिहासाची ध्वनिचित्रफीत काढावी, पत्रकारांचे स्वातंत्र्य आंदोलनात योगदान या विषयावर परिसंवाद ठेवावा, अशा विविध मौलिक सूचना एमजी मोमीन, सुरेश पाटील नेत्र गावकर, वी.एस. कुलकर्णी, युवराज धोत्रे, राम मोतीपवळे, अर्जुन जाधव, राजू मोगले, सुनील हावा, बालाजी सुवर्णकार, विक्रम हलकी कर,बाबासाहेब टाळकुटे, रमेश कोतवाल, शकील मणियार,बसवेश्वर डावळे, लक्ष्मीकांत मोरे, जहिरोद्दीन शेख, डॉ.प्रदीप ब्रह्मपुरी कर यांनी मांडल्या यावेळी नागराळकर म्हणाले पत्रकारांच्या सूचना चा आदर करून संमेलन चांगले बनविण्याचा प्रयत्न करू. समारोपात ना.बनसोडे म्हणाले साहित्य संमेलना संबंधी पत्रकारांनी सकारात्मक बातम्या दिल्यामुळे चागली वातावरण निर्माण झाले आहे, दिलेल्या सूचनांवर अंमल करून पत्रकारांचा सन्मान राखला जाईल. पत्रकारांनी आयोजक म्हणून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकारांनी यावेळी साहित्य संमेलनासाठी देणगी जाहीर केली .सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहूरे यांनी केले.
साहित्य संमेलन नियोजनासंदर्भात पत्रकारांची बैठक!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 08, 2022
Rating:
