खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना विमा कवच लागू केल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन
सह्याद्री न्यूज | बालाजी सुवर्णकार
उदगीर : लातूर जिल्ह्यात अनेक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कार्यरत असून या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग मोठ्या प्रमाणात सेवेत असून अनेक वर्षापासून चे शिक्षक संघाचे विमा कवच मागणीचा पाठपुरावा संचालक मंडळाकडे करण्यात आला होता. या मागणीला शिक्षक संघटनेला यश प्राप्त आले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने निर्णय घेऊन लातूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना दहा लाख वैयक्तिक कर्ज व पाच लाख रुपये विमा कवच लागू केल्याबद्दल माननीय श्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब चेअरमन माननीय श्री धीरज भैया देशमुख साहेब यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे आभार जिल्हाप्रमुख राहुल देशमुख जिल्हाध्यक्ष माननीय शरणाप्पा अंबुलगे, राजकुमार कंजे, परमेश्वर सावंत, संभाजी नवघरे, परमेश्वर साळुंके, खंडू मुळे, रतन मुळे, राहुल उपाशे व महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शाळांचे शिक्षक ग्रुपचे संस्थापक बालाजी सुवर्णकार कार्याध्यक्ष सलीम बागवान सचिव दत्ता पाटील सहसचिव नागनाथ सोमवंशी कार्याध्यक्षा नामदेव जावरे सदस्य जरीना पठाण यांच्यासह अनेक शिक्षकांनी संचालक मंडळांचे अभिनंदन केले आहे.
खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना विमा कवच लागू केल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 08, 2022
Rating:
