सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : अनेक आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या कोळसा धुळीच्या प्रकोपाला कंटाळून चिखलगाव परिसरातील कोल डेपो तातडीने हटविण्यात यावे , या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात गावकरी रस्त्यावर उतरले.
चिखलगावातील वाय पॉईंटवर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे यवतमाळकडून वणीकडे येणारी तसेच वरोरा बायपासने यवतमाळकडे जाणारी वाहने व सोबतच वणीवरून यवतमाळकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिवासी सेलचे प्रदेश अध्यक्ष राजू तोडसाम सहभागी झाले होते. त्याचा सहभागा मुळे पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये व गावकरी मध्ये उत्साह वाढला, दुपारी दोन वाजता आंदोलनाला सुरुवात झाली, मार्गावरील वाहतूक अडवून धरली. नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचविणारे कोल डेपो तातडीने हटविण्यात यावे, या मागणी करीता राष्ट्रवादी पुर्ण ताकदीने काम करणार व प्रदुषणाच्या या प्रश्नकर्ता मी धावून येणार असे वचण माजी आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी दिले.प्रशासकीय अधिकारी यांचा आशीर्वादा मुळे हे कोलडेपो सुरु आहे,त्यांच्या आर्थिक संबंधा मुळे आम्हचा आवाज पोहचत नाही आहे, त्याकरिता आता आम्ही १ एप्रिल ला वणी तहसील कार्यालयात घंटानाद आंदोलन करून आम्हचा आवाज पोहोचवणार असल्याचे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी पत्रकाराशी बोलतांनी सांगीतले.
या आंदोलन यशस्वी करण्याकरीता राष्ट्रवादीचे विजय नगराळे, सूर्यकांत खाडे, चिखलगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या अंजुम रियाज शेख, राजुभाऊ डावे, गुणवंत टोंगे, हेमंत गावंडे, कर्माताई तेलंग, वैशाली तायडे, मोबीन शेख, शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य, मनोज वाकटी, प्रणय बलकी, संदेश तिखट, सतेन्द्र मंडल, अतुल इखारे व शेकडो कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस चे चिखलगाव लालपुलीया येथे चक्काजाम आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 15, 2022
Rating:
