Top News

रस्त्यासाठी चक्का जाम आंदोलन


सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : तालुक्यातील हटवंजारी पोड वस्तीत स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात रस्ता मंजूर होऊन रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाले. परंतु अचानक एका शेतकऱ्याने शेतातून रस्ता करण्यास विरोध केला.

याविरुद्ध येथील आदिवासी बांधवांनी प्रशासनाला निवेदन दिले. प्रशासनाने उपाययोजना करूनही अजूनही रस्त्याचे काम ठप्प आहे. 

त्यामुळे त्रस्त गावाकऱ्यांनी रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी येत्या १७ मार्च रोजी दुपारी १२ वाजतापासून वणी यवतमाळ रोडवरील बुरांडा बस निवाऱ्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 
Previous Post Next Post