महादीप चाचणी मध्ये पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीत


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी : तालुका स्तरीय महादीप चाचणी मध्ये अंतिम फेरीत जिल्हा परिषद शाळा अहेरअल्ली येथील ५ पैकी ५ विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी पात्र झालेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अहेरअल्ली येथील जिल्हा परिषद शाळेने गगन भरारी झेप घेतली आहे.

महादीप चाचणी मध्ये प्रामुख्याने अहेरअल्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिल्पा विनोद शिरपूरे (वर्ग ७ वा), अनुश्री प्रफूल भोयर (वर्ग ६ वा), ईश्वरी अशोक केळवतकर (वर्ग ६ वा), ओम दिपक भोयर (वर्ग ५ वा), समर्थ राजेश राउत (वर्ग ५ वा) हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी पात्र झालेले आहेत. सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी अतिशय परिश्रम घेत आहेत. या कार्यात पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी प्रकाश नगराळे, सरपंच हितेश राऊत व शाळेचे मुख्ध्यापक शंकर केमेकार व शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते.

शाळेकडून विशेष परिश्रम घेण्यात आले. जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व शक्षक, शिक्षिका व शाळा व्यवस्थापन समिती अहेरअली तथा ग्रामपंचायत अहेरअली यांच्यातर्फे अभिनंदन व कौतूक करून जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महादीप चाचणी मध्ये पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीत महादीप चाचणी मध्ये पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीत Reviewed by सह्याद्री चौफेर on March 15, 2022 Rating: 5
Powered by Blogger.