रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम टाकरखेडा -डोर्ली या ठिकाणी विविध उपक्रमाने संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री नानाजी पाटील खंडाळकर यांच्या शुभहस्ते झाले.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. जिवन पाटील कापसे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, सरपंच डॉ. रामदास नगराळे, उपसरपंच वैष्णवीताई शेंडे, ग्रामसेविका सौं. चव्हाण मॅडम विचारपिठावर उपस्थित होते.सात दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाळासाहेब देशमुख यांनी यावेळी विषद केली.

शिबिरादरम्यान स्वयंसेवक स्वयंसेविका व गावकऱ्यांच्या श्रमदानातून नाले साफसफाई करण्यात आले तसेच मारेगाव ते टाकरखेडा व डोर्ली रस्ता सफाई सोबतच पर्यावरण, साक्षरता जनजागृती,अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसनमुक्ती, स्त्री पुरुष समानता आदी विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम व पथनाट्य स्वयंसेवकांनी सादर केलीत.सोबतच कोरोना लसीकरण घेण्यात आले.

शिबिरादरम्यान बौद्धिक सत्रात विविध मान्यवरांची व्याख्याने झाली त्यात प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापन व व्यसनमुक्ती या विषयावर डॉ. राजेश चवरे, डॉ. कुलकर्णी सर डॉ. चिरडे सर संविधानाची मूल्ये व मतदान जनजागृती याविषयावर लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील प्रा. जी. बी. माघाडे, डॉ. सोडणर सर, प्रा. आत्राम सर, प्रा. जेणेकर सर, महिला सक्षमीकरण व सकारात्मक विचार या विषयावर सौ. किरणताई देरकर, डॉ. माधुरी तानूरकर, सकस आहार व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर डॉ. श्रीराम खाडे, डॉ. विभा घोडखांदे, डॉ. मीनाक्षी कांबळे, पर्यावरण जनजागृती व वृक्षसंवर्धन या विषयावर डॉ. विनोद चव्हाण, प्रा. कांबळे सर, डॉ. अडसरे सर, प्रा. माकडे सर, प्रा. वांढरे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच नित्यनियमाने डॉ. नितेश राऊत सर यांनी योगासने घेतली. या विशेष शिबिरात गावकऱ्यान करिता आरोग्य शिबीर, पशुचिकित्सा शिबीर व महिला दिनानिमित्त रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, अभिजित पंढरपूरे व आकाश कुमरे यांचा लोक कला संगीत, प्रा. हेमंत चौधरी सर यांचा हास्य कार्यक्रम, नागेश रायपुरे, स्वरधारा संगीत रजनी, श्री. संदीप गोहोकार यांचा शिवचरित्र, प्रा. डॉ. गजानन सोडनर यांनी रशिया-युक्रेन यांचा पेचप्रसंग व जागतिक स्थिती आणि प्रा. भगत सर आणि रासेयो विद्यार्थ्यांनी आदिनी ग्रामवासियांचे मनोरंजनातून प्रबोधन करण्यात आले.
(शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक वृंद)

शिबिराचा समारोपीय कार्यक्रम प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषद सदस्य सौ. अरुणाताई खंडाळकर, मारेगाव चे नगराध्यक्ष डॉ. मस्की साहेब, इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. गजानन सोडनर श्री. जगन्नाथ बाबा विद्यालय येथील मुख्याध्यपाक श्री. चिकटे सर, जनता विद्यालय वणी येथील माजी मुख्याध्यपक श्री. वऱ्हाटे सर, उपसरपंच वैष्णवीताई शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी आदर्श स्वयंसेवक-स्वयंसेविका म्हणून विनीत खोके आणि कु. आचल किन्हेकार यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्याचे शिबिराविषयी मनोगत घेण्यात आले. शिबिराचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल भांदककर आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले.शिबीर यशस्वीते करिता प्रा. भगत सर प्रा. स्नेहल मॅडम प्रा. शेंडे मॅडम गटप्रमुख गौतम सैनी, वैष्णवी मुंनघाटे व सर्व रासेयो विद्यार्थी सह, सर्व महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या विशेष शिबिराकरिता आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर व अधिक्षक रविभाऊ धानोरकर, विलास असुटकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.
रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on March 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.