अवैध रेती च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चा झुंड उपविभागीय अधीकाऱ्याच्या दालनात

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : वणी विभागातील बेलोरा, आपटी, पुनवट, कोसारा, चिंचमंडळ, दापोरा व इतर घाटामध्ये रेती चा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, या घाटावरील रेती च्या उपस्याचे व दळणवळणाचे वास्तविक परिस्थितीचे निरीक्षण करुन येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर प्रमाणे रेती चोरीचा प्रकार सुरू आहे.

घाटावर पिलोडर,मोटोराइज बोट चा वापर करुन रेतीचा उपसा करण्यात येत आहे, प्रशासनाकडून दिलेल्या परवानगी मध्ये त्याचा वापर करता येत नाही, तरी पण याचा सर्रास वापर सुरू आहे, त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही केली तर 5 लक्ष दंड होऊ शकतो, पंरतु प्रशासनातील काही लोका सोबत आर्थिक हितसंबंध साधून हे सर्व अवैध काम सुरू आहे.
महसूल प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या रॉयल्टीवर मॅजिक पेन चा खुलेआम वापर केल्या जात आहे.रॉयल्टीवर खोडतोड करून उष्णता दिल्यास रॉयल्टीवरील शाई नाहीशी होते त्यावर रॉयल्टीची तारीख व वेळ कोरी होते.आपल्या मताने तारीख व वेळ लिहुन महसुल प्रशासनाची दिशाभूल येथील रेती तस्कर करीत आहे.

वणी विभागातील रांगणा या घाटाला परवानगी देउ नये, तीथे सर्व नियम धाब्यावर ठेऊन उपसा करण्यात आला होता, यावेळी सुद्धा तोच प्रकार तिथे होणार आहे त्यामुळेच त्यांना परवानगी देण्यात येवुनये तसेच,
मारेगाव तालुक्यात वाळू तस्करांनी नदीत वेगळा घाट तयार केल्यानंतर आजूबाजूला असलेल्या नाल्यातून प्रचंड प्रमाणात वाळूचा उपसा सुरू केलेला आहे.ही वाळू रात्री बेरात्री कँनलचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येत आहे.वाळू तस्करावर नियंत्रण ठेवणारे कर्मचाऱ्यांचे वाळू सारखे मऊ हात ओले होत आहे. आता जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून करोडो रुपयांचा महसूल बुडीत काढणाऱ्या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब व उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशन ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनाची दखल घेऊन कारवाई केली नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा स्वप्नील धुर्वे यांनी दिला. निवेदन देताना पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे,कर्माताई तेलंग,वैशालीताई तायडे,शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य,मोबीन शेख, युवक चे तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, विद्यार्थी शहराध्यक्ष संदेश तिखट,हार्दिक उरकुंडे,सचिन चव्हाण उपस्थित होते.
अवैध रेती च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चा झुंड उपविभागीय अधीकाऱ्याच्या दालनात अवैध रेती च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चा झुंड उपविभागीय अधीकाऱ्याच्या दालनात Reviewed by सह्याद्री चौफेर on March 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.