"आदिवासी समाजांनी शेती व्यवसाया सोबतच औद्योगिक क्षेत्रात पुढे यावे" - उद्योगपती पी. एल. कुमरे

सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : तरोडा ता. घाटंजी येथे क्रांतिकारक विर बाबुराव शेडमाके यांची जयंतीचे निमित्य कार्यक्रमात प्रमुख वक्ते पांढरकवडा येथिल आदिवासी समाजातील चंदन शेती प्रकल्पा चे डायरेक्टर उद्योगपती श्री पी. एल. कुमरे यांनी उपस्थित आदिवासी जन समुदायला जनजागृती करताना आपल्या गोंडी भाषेत भाषणात मन्हणाले की, आपला समाज अल्पसमाधानी राहून चालणार नाही.त्या करिता फक्त पारंपरिक शेती व्यवसाया वर विसंबून न राहता आधुनिक पद्धत्तीने शेती व्यवसाय करावा. आपल्याला धनवान बनायचे असेलतर शेतात चंदन, किडाजडी, अश्या मौल्यवान वनस्पतीची लागवड करून करोडोपती बनण्याचे स्वप्न उरासी बाळगल्या शिवाय आदिवासी समाजाची प्रगती होणार नाही. आजच्या प्रगत युगात सक्षम जीवन जगायचे असेल तर कष्ट करा. तांत्रिक ज्ञान मिळवून औधोगिक तंत्रचा अवलंब करा. आपण आर्थिक दृष्टया सक्षम झालो तरच आपल्या समाजाची प्रगती होईल.कारण उपश्या पोटी क्रांती घडवू शकत नाही. असे प्रतिपादन यांनी यावेळी प्रमुख वक्ते म्हणून केले.
ऑ. ई. आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय सदस्य पवनकुमार आतराम यांनी सांगितले की,आदिवासी समाजातील तमाम लोक एकत्र आल्या शिवाय आपली संघटन शक्ती वाढणार नाही. आपसातील हेवे दावे विसरून सर्व समाज एक व्हा. आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीविर बिरसामुंडा, शहीद बाबुराव शेडमाके यांचे आदर्श डोळ्या समोर ठेवून वाटचाल करा.
 यानंतर कोया गोटूल समितीचे अध्यक्ष प्रल्हाद सिडाम यांनी समजप्रबोधन करताना सांगितले की, आपला समाज दऱ्याखोऱ्यात राहणारा असल्या मुळे तुम्ही शिक्षित होऊ शकले नाहीत, परंतू आता आपल्या मुलांना शिक्षित करा. तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकले नाही परंतू तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर चे बाप बनू शकता. असे सांगितले.
 मा.अभियंता विधुत कंपचे मनोहरराव मसराम, यांनी प्रथम आदिवासी समाज जागृत होणे गरजेचे आहे. समाजाला शिक्षत व संघटित होवून संघर्ष केल्या शिवाय तारनोपाय नाही असे खडसावून सांगितले.भूमक महासंघाचे श्री माणिकराव तोडसाम यांनी भूमक महासंघाचे वतीने समाजात गोंडीयन धर्मा प्रमाणे धार्मिक विधी करायला पाहिजे. आपण गोंडीधर्मीय असल्यामुळे या नंतर समाजातील विवाह व ईतर सर्व विधी ब्राह्मणा कडून न करता भुमक यांचे कडूनच करावा. आपली संस्कृती व बोलीभाषा ची जोपासना करावी. असे सांगितले.

चिखलवर्धा येथिल महिला सरपंच उच्च विभुषीत, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या कु. वर्षा कन्नाके यांचे मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना त्या मन्हाल्या की, माझी घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील मी सॉफ्टवेअर इंजिनिर झाले. या करिता जिद्ध, चिकाटी आणी आत्मविश्वास बळकट असायला पाहिजे. आदिवासी युवक युवतीनी अश्या टेक्निकल क्षेत्रात उडी घेऊन आपली प्रगती, योग्य उदिष्ट साध्य करावे. असा मोलाचा सल्ला दिला.
अध्यक्षीय भाषणात भाऊराव मरापे यांनी आदिवासीची पारंपरिक संस्कृतीला जपा आपली संस्कृती हे श्रेष्ठ शाश्त्र आहे. प्रत्येक रितिरिवाज, चालीरिती हे निसर्ग नियमानुसार अस्तित्वात आहे. त्याचे अनुकरण ईतर धर्मीय करताना दिसतात म्हणून आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे. आपला धर्म हिंदू नसून आपण गोंडीयन, निसर्ग धर्माचे असल्याचे त्यानी सांगितले.
यावेळी मंचवर मा. नगराध्यक्ष भाऊराव मरापे, उद्योगपती पी. एल. कुमरे, कोया पुनेम गोटूल समितीचे अध्यक्ष प्रल्हाद सिडाम, मा. उपमुख्य अभियंता मनोहरराव मसराम, ऑ. ई. आदी. एम्प्लॉईज फेड. चे पवनकुमार आतराम, पीपल्स फेडरेशन चे उपाध्यक्ष गुलाबराव मेश्राम, भूमक महासंघाचे माणिकराव तोडसाम अमरावती,युवा उद्योजक अजय घोडाम, तारोडा च्या सरपंच सौ योगिता कुळसंगे, चिखलवर्धा सरपंच इंजि. कु. वर्षा कन्नाके,मा. जि. प. सदस्य तुरपाबाई पुसनाके,सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कोवे,भीमराव कुळमेथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश आतराम तर आभार कार्यक्रमाचे मुख्य आयोजक लक्ष्मण कुळसंगे यानी मानले.

या कार्यक्रमाला परिसरातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह भोजनाचा नंतर कार्यक्रमांची सांगता झाली.

"आदिवासी समाजांनी शेती व्यवसाया सोबतच औद्योगिक क्षेत्रात पुढे यावे" - उद्योगपती पी. एल. कुमरे "आदिवासी समाजांनी शेती व्यवसाया सोबतच औद्योगिक क्षेत्रात पुढे यावे" - उद्योगपती पी. एल. कुमरे Reviewed by सह्याद्री चौफेर on March 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.