उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : गडचिरोली मुख्य मार्गावरील सावली शहरात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या प्रयत्नातून रस्ते महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी गडचिरोली ते मुल पर्यंत चारशे कोटी रुपयाचा सिमेंट रस्ता मंजूर केला व त्याचे काम 90 टक्के हे पूर्णत्वास आलेले आहे. जनतेची मागणी लक्षात घेत खासदार अशोकजी नेते यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सावली शहराच्या मध्यभागातून हा नॅशनल हायवे गेलेला असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये भरधाव वेगाने गाड्या जात आहे. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासाठी ग्रामीण रुग्णालय जवळ,आयडीबीआय बँक ते रमाबाई आंबेडकर विद्यालय चौकात,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे, सावली शहरातील बसस्थानक परिसरात,महात्मा ज्योतिबा फुले चौकात व बाजार समिती जुना नाक्या परिसरात वेगावर नियंत्रण करण्यासाठी गतिरोधक लावावे अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी,केंद्रीय महामार्ग अभियंता तसेच खासदार अशोकजी नेते यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर जनतेच्या मागणी कडे त्वरित लक्ष घालून गतिरोधक लवकरात लवकर लावावे अश्या मागणी चे इमेल सतीश बोम्मावार यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना पाठविले आहे.
सावली शहरात मुख्य मार्गावर गतिरोधक लावा-भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 27, 2022
Rating:
