टॉप बातम्या

श्री रामनवमी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजयभाऊ चोरडिया यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : येथील रामनवमी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येते.

यावर्षी हा उत्सव साजरा करण्याकरिता २६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिर जुनी स्टेट बँक जवळ रामनवमीच्या निमित्ताने बैठक घेण्यात आली. त्यात श्रीरामनवमी उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून विजय चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्ष अरुण कावटकर, सचिव पदी श्याम बडगरे, यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राजाभाऊ बिलोरीया, दिपक छाजेड, किरण बुजोणे, गुलाब बिलोरिया, सतीश बिलोरिया व श्री राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post