कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यातील आत्महत्या चे सत्र थांबता थांबेना दर आठवड्यात एक ना एक आत्महत्या होत असल्याचे वृत्त समोर येतच असते. त्यातच आज रोजी खैरगांव (भेदी) येथे एका शेतकऱ्याने स्वतः च्या शेतात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
अतिवृष्टी चा फटका व सतत ची नापिकी शिवाय डोक्यावर खाजगी कर्ज याला कंटाळून गोविंद पैकू आत्राम (५५) रा खैरगांव (भेदी) याने गावालगत असलेल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
सतत च्या नापिकी ने ते गेल्या काही दिवसापासून तणावात होते अशी स्थानिकात चर्चा आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन विवाहित मुली असा आप्त परिवार आहे.
या घटनेची माहिती सरपंच तुळशीराम कुमरे यांनी मारेगाव पोलिसांना दिली.
तर, दुसरी घटना मुकटा येथे...
विष प्राशन करणारा अंदाजे ७० वर्षे वामन श्रावण इनामे असे विष प्राशन केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे रवाना करण्यात आले अशी माहिती स्वतः वामन यांच्या मुलाने मोबाईल द्वारे माध्यमांना दिली.
शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 27, 2022
Rating:
