सौ हर्षा चेतन आगलावे यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : ईगल सोशल ग्रुप,साई म्युझीकल ग्रुप व श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी तर्फे आज स्व लता मंगेशकर श्रद्धांजली पर गीतगायन सोहळा व 
सौ हर्षा चेतन आगलावे यांचा सत्कार सोहळा 
स्थानिक वसंत जिनींग हॉल वणी येथे पार पडला.

सौ हर्षा आगलावे यांचा कोरोना काळातील व त्यानंतरच्या ही विविध सामाजिक कार्यासाठी 
 माया चाटसे सहाय्यक पोलीस निरीक्षक वणी व डॉ सौ संचिता नगराळे - स्त्री रोगतज्ञ वणी या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती रुपालीताई हिवरकर यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी सौ किरणताई देरकर या उपस्थित होत्या.
सौ हर्षा आगलावे यांच्या सामाजिक कार्यासाठी पुर्वी ही वणी त सत्कार करण्यात आलेला आहे.


सौ हर्षा चेतन आगलावे यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान सौ हर्षा चेतन आगलावे यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान Reviewed by सह्याद्री चौफेर on March 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.