आकापूर येथील युवकांची गळफास घेऊन आत्महत्या

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील आकापुर (लाखापूर) येथील २७ वर्षीय युवकाने स्वतः च्या शेतामध्ये पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दि. २९ मार्च रोजी सकाळी ७:१५ वाजताच्या दरम्यान घटना उघडकीस आली.
 
प्रवीण भानुदास जांभुळकर (२७) रा. आकापूर (लाखापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.
     (मृतक प्रवीण भानुदास जांभुळकर वय २७ रा. आकापूर)

घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून,घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृत्यूदेह पोस्टमार्टम साठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहे.
आकापूर येथील युवकांची गळफास घेऊन आत्महत्या आकापूर येथील युवकांची गळफास घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on March 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.