योगेश मडावी |
झरी : कोरोना काळात भयग्रस्त जीवन जगत असलेल्या गावकऱ्यांच्या मनावर नकलांच्या माध्यमातून हास्य फुलवता आले या निमित्त्याने लोककलेचा गुदमारलेला श्वास मोकळा झाला असे मत लोककलावंत नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांनी व्यक्त केले. श्रीमती लक्ष्मीबाई राजगडकर कला महाविद्यालयाच्या वतीने चारगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात लोकरंजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सभापती संजय पिंपलशेंडे, दिनकर पावडे, प्राचार्य बेले, सरपंच स्वप्ना नावडे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. दिलीप अलोणे व राम झिले या कलावंतांनी विविध नकलांच्या माध्यमातून लोकमनोरंजना बरोबर प्रबोधनही केले. गावकऱ्यांनी दाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रम अधिकारी प्रा. ठमके यांनी या लोककलावंत यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार केला.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात दिलीप अलोणे यांचे प्रबोधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 13, 2022
Rating:
