सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील तलाठी गेल्या कित्येक दिवसापासून गावाकडे फिरकले नाही. किंबहुना येथील नेमका तलाठी आहे तरी कोण? असा प्रश्न पडला असून अनेकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या विविध योजना असो की शासकीय काम यासाठी तलाठ्याच्या दाखला घ्यावा लागतो मात्र, येथील तलाठी मुख्यालयी किंबहुना फिरकत नसल्याने नागरिकांना त्यांच्याकडे हेलपाट्या माराव्या लागत आहे. येथे तलाठीच नसल्याने जन सामान्यांचे काम रखडले आहे.
याबाबत संबंधितांना विचाराणा केली असता ते एकमेकांवर चाल ढकल करीत असल्याचे प्रकार सुरु आहे याचा मनस्ताप ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे मच्छिन्द्रा येथे तलाठी आहे की नाही, शिवाय येथील तलाठी आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मच्छिन्द्रा येथे तलाठी आहे की नाही
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 14, 2022
Rating:
