सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : जागतिक दिनाचे औचित्य 'जागर स्री शक्ती'चा सर्व महिला संघटना एकत्रित येऊन शेतकरी मंदिर येथे १२ मार्च ला आयोजन केले होते. राष्ट्रमाता माता माँ जिजाऊ-सावित्री-रमाई-फातीमा च्या लेकींनी जागतिक महीला दिना चे औचित्य साधुन ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. उदघाटिका मायाताई चाटसे निर्भया पथक प्रमुख API पोलीस स्टेशन वणी तर अध्यक्षा म्हणून प्रीती जैन उद्योजीका नांदेड, प्रमुख पाहुणे डॉ उजमा शाह, वनश्री वनकर, शाईन शेख अध्यक्षा- जमात ए इस्लामी हिंद महीला संघटना वणी, तर सत्कार्मुर्ती म्हणून पर्यावरण प्रेमी प्रणाली चिकटे, मेघा जैन( युवा ऊद्दोजीका वणी )यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरणताई देरकर यांनी केले तरी संयुक्तिक संचालन सोनाली जेणेकर व दिशा फुलेझेले यांनी केले. तर मनोगत व आभार वैशाली पाटील यांनी केले.
सर्व संघटनांच्या सहभागामुळेच कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर झाला विशेष सहभाग :
सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन, राष्ट्रीय ओबीसी संघटना,धनोजे कुणबी महिला विकास संस्था, भारतीय बौद्ध महासभा, प्रयास महिला बहुउद्देशीय संस्था, सार्वजनिक महिला मंडळ, ओबीसी महिला समन्वय समिती, ध.कु.महीला शारदोत्सव. संघटना वणी, आर्य -वैश्य समाज महीला संघटना,एकच ध्येय हात मदतीचा संघटना, सखी मंच महिला संघटना, जैन समाज, सार्वजनिक महिला संघटना, सोनार समाज, नाभिक समाज, सुतार समाज, जमात ए इस्लामी हिंदमहिला विभाग (वणी), जिजाऊ ब्रिगेड, व जेसीआय महीला संघटना इतर महिला संघटना वणी विधानसभा
जागतिक महिला दिनानिमित्य विविध सामाजिक संघटनाच्या महिलांना मिळाला कला गुणांना वाव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 14, 2022
Rating:
