व्यसनात पैसे खर्च करण्याऐवजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करा - नयन मडावी



योगेश मडावी | 

झरी : शेवाळा येथे गोंडराजे वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती पावन पर्वावर मोठ्या ऊत्सवात शनिवारी (12 मार्च) साजरी करण्यात आली. त्या दरम्यान शिवचरित्रकार नयन मडावी शिंदोला यांचे वीर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतिकारी लढ्यावर व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानातून पालकांनी व्यसनात पैसे खर्च करण्याऐवजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करा असे प्रतिपादन नयन मडावी यांनी केले.

ईतिहासाच्या पानांवर लुप्त पावत असलेले वीर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतिकारी लढ्यावर व्याख्यान करतांना नयन मडावी यांनी पालकांनी व तरुणांनी व्यसनमुक्त राहून आपले ध्येय गाठावे, पैसे दारूत वाया घालण्याऐवजी तेच पैसे आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी खर्चिक करा आणि त्यांचं जीवन उज्वल करावे असे त्यांनी वक्तव्य केले. त्यावेळी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ पिदूरकर, शेवाळा ग्रामपंचायतचे संरपच्या आञाम ताई, धनराज राजगडकर, गोपाल तुमराम, विनोद आत्राम, श्रीकांत कोडापे, मदन कोडापे तसेच शेवाळा येथील समस्त ग्रामवासीयाच्या उपस्थितमध्ये हा जंयती उत्सव आंनदी वातावरनात संपन्र झाल्याचे चिञ सर्व ग्रामस्थानी अनूभवले.
व्यसनात पैसे खर्च करण्याऐवजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करा - नयन मडावी व्यसनात पैसे खर्च करण्याऐवजी मुलांच्या शिक्षणावर खर्च करा - नयन मडावी Reviewed by सह्याद्री चौफेर on March 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.