सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शहरातील दामले फैल येथे राहणारा राहुल रमेश रामटेके (47) हा यवतमाळ रोड वरिल नटराज ट्रेडर्स या दुकानात हमाली करुन चौकीदारी करायचा. आरोपी महादेव वाढई (60) रा. दामले फैल हा त्या दुकाना जवळीलच देशी दारू दुकानात दारू पिण्याकरिता यायचा. 8 मार्चला दुपारी 2 वाजता महादेव वाढई हा दुकाना बाहेर झोपून असलेल्या राहुल रामटेके जवळ आला, व त्याला दुकानातून देशी दारू आणायला सांगितली. राहुलने देशी दारू आणली व तो झोपून असलेल्या ठिकाणी ठेवली. आरोपी उठल्यानंतर त्याला दारुची शिशी दिसली नाही. महादेवने दारू का आणली नाही म्हणून राहुलशी वाद घालत लाकडी दांड्याने त्याच्यावर प्रहार केला. राहूलच्या उजव्या हातावर व पाठीवर दांड्याचे वार बसले. तसेच त्याच्या डोक्यावर लाकडी दांड्याचा वार बसल्याने त्याचे डोके फुटले व डोक्यातून रक्त वाहू लागले. त्याला गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात जाऊन पोलिसांनी त्याचे बयाण घेतले असता त्याने महादेव वाढई याने लाकडी दांड्याने मारुन जखमी केल्याची तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरुन पोलिसांनी महादेव वाढई याच्या विरुध्द भादंवि च्या कलम 326 नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात जमादार बुर्रेवार करित आहे.
शुल्लक कारणावरुन लाकडी दांड्याने मारुन इसमाला केले जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2022
Rating:
