सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी : ६० व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत नुकतेच अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने चंद्रपूर इथे प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित क्षण एक पुरे नाटक सादर केले होते त्यावेळी चंद्रपूर करांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला होता.
या स्पर्धेचा निकाल काल महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाने जाहीर केला. यात या नाटकातील जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के यांनी तसेच बालकलाकार कु.राधा सोनटक्के या दोन्ही कलावंतांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी 'क्षण..एक पुरे' ही मर्मस्पर्शी नाट्यकृती कलावंतांनी सादर केली.
या पुरस्काराने वणीतील नाट्य चळवळीत मानाचा तुरा रोवला गेला. उल्लेखनीय म्हणजे वणीमध्ये एकेकाळी समृद्धशाली नाट्यपरंपरा होती. कालांतराने ती लोप पावत गेली. मात्र पुन्हा एकदा येथील रंगमंच चळवळीला नवीन उभारी देण्याचे काम प्राचार्य हेमंत चौधरी व त्यांची चमू करीत आहे, हे निश्चितच एक आशादायी चित्र असल्याचे या नाटकाचे सर्वेसर्वा प्राचार्य हेमंत चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितले आहे.
वणी च्या "क्षण एक पुरे" या नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत पटकावले अभिनयाचे दोन पारितोषिक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 10, 2022
Rating:
