पाेलिसांच्या पाल्यांना पाेलिस भरतीत आरक्षण द्यावे - पाेलिस बाँईजअसाेसिएशनची मागणी !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : पोलिस सेवेत असणाऱ्या पोलिसांच्या पाल्यांना पोलीस भरती मध्ये आरक्षण देण्यात यावे या आशयाच्या मागणीचे एक लेखी निवेदन मंगळवार दि.८ मार्चला पोलिस बॉईज असोसिएशन चंद्रपूर जिल्हा शाखाच्या वतीने नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांचे मार्फतीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना देण्यात आले.

सदरहु निवेदन महाराष्ट्र राज्य पाेलिस बॉईज असाेसिएशनचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रमाेद तानबाजी वाघमारे यांचे सुचनेच्या अनुषंगाने देण्यांत आले आहे. .उपराेक्त निवेदन सादर करतांना पोलिस बॉईज असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे , पदाधिकारी व अन्य सदस्यांची उपस्थिती होती.
पाेलिसांच्या पाल्यांना पाेलिस भरतीत आरक्षण द्यावे - पाेलिस बाँईजअसाेसिएशनची मागणी ! पाेलिसांच्या पाल्यांना पाेलिस भरतीत आरक्षण द्यावे - पाेलिस बाँईजअसाेसिएशनची मागणी ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.