रावसाहेब दानवेंच्या बेताल वक्तव्याचा नाभिक समाजाकडून निषेध

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात एका चर्चा सभेमध्ये बेताल वक्तव्य केले. त्यामुळे मारेगाव नाभिक समाजाकडून दानवेंचा तीव्र निषेध करण्यात असून समाजाच्या वतीने तहसीलदार पुंडे यांना निवेदन देण्यात आले.

जालन्यातील कार्यक्रमात बोलतांना दानवे म्हणाले, "ज्या प्रमाणे तिरुपती बालाजीच्या नाव्ह्याकडील ग्राहकाचे केस एकाच वेळेस न काढता सुरुवातीला दोन दोन वस्तरे हाणतात आणि बसवून ठेवतात नंतर त्यांच्या डोक्यावरील राहिलेले अर्धे केस दिवस वाळल्या नंतर काढतात" असे अपमानास्पद बोलल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असून, दानवे यांनी जाहिर माफी मागावी अन्यथा नाभिक समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. राज्यभर पडसाद उमटल्यानंतर मारेगाव येथे रावसाहेब दानवेंनी केलेल्या बेताल वक्तव्याचा नाभिक समाजबांधवानी तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी निवेदन देताना रवि घुमे, आनंद नक्षीने, संजय क्षीरसागर, अजय धांडे, विनोद नक्षीने, प्रमोद जांभुळकर, प्रमोद नक्षीने, अरविंद शेंडे, शंकर शेटे, अमित नक्षीने, राजू घुमे, शालिक जांभुळकर, छगन दर्वे, मोरेश्वर बनसोड यांच्यासह शहर व तालुक्यातील नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
रावसाहेब दानवेंच्या बेताल वक्तव्याचा नाभिक समाजाकडून निषेध रावसाहेब दानवेंच्या बेताल वक्तव्याचा नाभिक समाजाकडून निषेध Reviewed by सह्याद्री चौफेर on March 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.