गडचिराेलीत थाटात महिला दिन साजरा; नारीशक्तीचे आयोजन, मनिषा मडावींचा सत्कार !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन नारीशक्ती जिल्हा शाखा गडचिरोली यांचे वतीने मंगळवार दि. 8 मार्च 2022 ला मृणाली मेश्राम यांचे निवासस्थानी (गोकुळ नगर येथे) जागतिक महिला दिन थाटात व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गडचिरोलीच्या रंजिता काेडापे यांचे हस्ते झाले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रंजना गेडाम नगरसेविका, वर्षा शेडमाके माजी नगरसेविका तथा माजी सभापती नगरपरिषद, संध्या उईके माजी नगरसेविका, मीनल चीमुरकर, आरती कोल्हे व नीता बोभाटे ह्या महिला उपस्थित होत्या.सदरहु आयाेजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नारी शक्ती संघटनच्या अध्यक्षा जयश्री येरमे यांनी भूषविले हाेते. सदरहु कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डाँ .बाबासाहेब आंबेडकर आणि विरांगणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमात मनीषा मडावी व त्यांच्या पथकाने मॉडलिंग मध्ये पुणे येथे पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल जागतिक महिला दिनी त्यांच्या पथकाचा प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महिला दिना निमित्त्याने लक्ष्मी कन्नाके,सपना दुबे, भूमिका बर्डे, मृणाली मेश्राम, बिना उईके अंजली कोडापे यांच्या पथकाने समूह नृत्य व गीत सादर केले. तर वंदना मडावी यांनी संसारातील स्त्रीच्या व्यथा यासंबंधीची कविता कार्यक्रमात सादर केली. वैयक्तिक नृत्य शालिनी पेंदाम व सपना दुबे यांनी सादर केलीत. या भरगच्च कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी महिलांचे हक्क व अधिकार, त्यांच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार तसेच महिलांची सुरक्षितता, शिक्षण,आरोग्य आणि समाजात तसेच कुटुंबात महिलांचे भरीव योगदान याबाबत आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भारती मडावी (सचिव नारी शक्ती संघटन,)यांनी केले तर प्रास्ताविक रेखा तोडासे (कार्याध्यक्ष) यांनी केले उपस्थितीतांचे आभार अंजली कोडापे सदस्य यांनी मानले. थाटात पार पडलेल्या या कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मृणाली मेश्राम, अंजली कोडापे, विना उईके, मंजुषा कन्नाके,लक्ष्मी, कन्नाके ,भारती मडावी, रेखा तोडासे, नेहा गेडाम, शालिनी पेंदाम, वंदना मडावी आदींनी अथक परिश्रम घेतले.
गडचिराेलीत थाटात महिला दिन साजरा; नारीशक्तीचे आयोजन, मनिषा मडावींचा सत्कार ! गडचिराेलीत थाटात महिला दिन साजरा; नारीशक्तीचे आयोजन, मनिषा मडावींचा सत्कार ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.