सह्याद्री न्यूज | रवि घुमे
यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन शाखा- यवतमाळ २०२२ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीसांच्या पोलीस पाल्यांना पोलीस भरती मध्ये ५ टक्के आरक्षण मिळुन देणारी एकमेव संघटना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन ही पोलीस व पोलीस कुटुंबा साठी जनतेच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र मध्ये काम करणारी एकमेव गैर राजकीय संघटना आहे .
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ मध्ये मागील ५ वर्षी पासून यवतमाळ मध्ये कार्यरत आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ शाखाची नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
अतीक अफजल शेख जिल्हाध्यक्ष यवतमाळ, ओंकार करंदीकर जिल्हा उपाध्यक्ष,पियुष घोळवे जिल्हा सचिव, देव मेश्राम सहसचिव,बोनी अनवीकर जिल्हा सदस्य, संतोष वारे शहर अध्यक्ष,शारीक शेख शहर उपाध्यक्ष, रियाज शेख शहर सचिव, सर्व पदाधिकारी व पोलीस कुटुंबीय कार्यक्रमात उपस्थित होते.
अतिश शेख यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल भारतिय मानवाधिकार परिषद जिल्हाध्यक्ष रूस्तम शेख यांनी आभिनंदन व्यक्त केले.
अतिक शेख यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज असो यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2022
Rating:
