कळंब येथे ड्रेस डिझायनिंग व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळंब : कलाकुंज बहुउद्देशीय महिला प्रशिक्षण संस्था यवतमाळ द्वारा संचालित महिला सक्षमीकरण "गाव तिथे महिला प्रशिक्षण" योजनेअंतर्गत ड्रेस डिझायनिंग ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटन राम मंदिर रोड कळंब येथे करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा अजित राठोड ठाणेदार कळंब, प्रा भुजाडे सर,सेवानिवृत्त अधीक्षक मा अशोक भाऊ उमरतनकर,भारतीय नारी रक्षा संघटनेच्या पदाधिकारी सारिका ताई ठोंबरे, मनीषा कोठारी नगरसेवक अज्जूभाई शेख, नगरसेवक रुपेश राऊत, कला कुंज चे सचिव दुर्गा पटले, ड्रेस डिजाइनिंग प्रशिक्षिका जोशना, बीसेन सौंदर्य शास्त्र च्या प्रशिक्षिका राखी मेश्राम, उर्मिलाताई कवडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. 
प्रा भुजाडे सर यांनी महिला सक्षमीकरण व स्वावलंबी कशा बनतील यासाठी कळंब चे ठाणेदार मा अजित राठोड यांनी महिलांवर होणारे अत्याचार आणि सक्षम होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना रूपाली भोयर यांनी केली आभार प्रदर्शन शालिनी बोपचे यांनी केले.
कळंब येथे ड्रेस डिझायनिंग व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कळंब येथे ड्रेस डिझायनिंग व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन Reviewed by सह्याद्री चौफेर on March 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.