हॅपी होम अंगणवाडी साठी लातूर जिल्हा परिषद राज्यात सर्वोत्कृष्ट


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मुंबई : लातूर जिल्हा परिषद विविध उपक्रम राबविण्यात व या सर्व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये यशस्वी ठरत असून जिल्हा परिषदेच्या हॅपी होम अंगणवाडीसाठी राज्य शासनाच्या विविध मंत्रीमहोदयांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड यांचा मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सत्कार करण्यात आला.

आज दिनांक ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हॅपी होम अंगणवाडी प्रकल्प राबवून लातूर जिल्हा मधील एक हजार अंगणवाड्या या डिजिटल केल्यामुळे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महिला व बालविकास समिती सभापती ज्योती ताई राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालय मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
 लातूर जिल्हा परिषदेने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले असून राज्यशासन व संपूर्ण राज्यभरात सुद्धा लातूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमांची दखल घेण्यात येत आहे.

लातूर जिल्हा परिषदेने स्वतःचा लातूर पॅटर्न याद्वारे तयार केला असून महाराष्ट्राच्या इतर जिल्हा परिषद यांसाठी तो दिशादर्शक ठरणार आहे.
हॅपी होम अंगणवाडी साठी लातूर जिल्हा परिषद राज्यात सर्वोत्कृष्ट हॅपी होम अंगणवाडी साठी लातूर जिल्हा परिषद राज्यात सर्वोत्कृष्ट Reviewed by सह्याद्री चौफेर on March 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.